तांत्रिक कारणाने बस पेटली पीएमपी प्रशासनाचे म्हणणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोथरुड डेपोमधून बाहेर आणून रस्त्यावर लावण्यात आलेल्या बसला पहाटे अचानक आग लागली. भारत बंदच्या पार्श्वभूूमीवर ही बस पेटविली गेल्याचे सांगितले जाऊ लागले होते. मात्र, तांत्रिक कारणाने बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

वारजे ते चिंचवड ही बस वाहक व चालकांनी घेऊन बस पार्किंगमधून टेस्टींग करुन बाहेर आणून रस्त्यावर लावली व ते हजेरी लावण्यासाठी पुन्हा डेपोमध्ये गेले़ त्यादरम्यान रस्त्यावर असणाºया बसने अचानक पेट घेतला़ तेथे असणा-यांनी त्याचे फोटो व व्हिडिओ तातडीने व्हायरल केले़ मनसे कार्यकर्त्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी ती पेटवून दिली अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली होती.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01GZPDV2W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7986b11c-b4c4-11e8-82d3-1936b3b4d030′]

अग्निशामन दलाला या घटनेची माहिती सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तातडीने गाडी घटनास्थळी जाऊन त्यांनी आग विझविली. पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.

भारत बंदला पुण्यात हिंसक वळण