नेमकं या कारणामुळे हार्दिक पटेलने घेतले उपोषण मागे 

अहमदाबाद : वृत्तसंस्था

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने आज  १९  व्या दिवशी आपले उपोषण समाप्त केले. पाटीदार समजाला आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी २५ ऑगस्टपासून हार्दिक पटेल उपोषणावर बसले होते. पाटीदार समाजाच्या लोकांनी जिवंत राहून समाजासाठी लढा देण्याची विनंती केल्याने उपोषण तोडण्याचा निर्णय घेतला, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B07417987C,B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18da8cb8-b68d-11e8-bb7f-3342087be3ee’]

गुजरातमधील शेतकरी बांधवांची कुलदेवता श्री उमिया माताजी मंदिर-उंझा आणि श्री खोडल माताजी मंदिर-कागवडच्या प्रमुख लोकांनी मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळेच मी हे उपोषण मागे घेत असल्याचे हार्दिक पटेलने म्हटले आहे.

बुधवारी पाटीदारांची प्रमुख संस्था खोड धाम आमि उमिया धामचे नेते उपोषण स्थळी पोहोचल्यानंतर हार्दिक पटेल यांनी उपोषण मागे घेतले. पाटीदार नेते सीके पटेल, नरेश पटेल, जेराम पटेर यांनी हार्दिक यांनी लिंबू पाणी आणि नारळ पाणी पाजून हार्दिक पटेल यांचे उपोषण तोडले.
[amazon_link asins=’B077WKW3NB,B075P7BLV5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ccd46bf-b68d-11e8-8f07-d51896c69476′]

शेतकरी कर्जमाफी, शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसी समाजासह पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या हार्दिक पटेलच्या मागण्या सरकारने आद्यपही  केल्या  नाहीत.

जाहिरात

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.