…म्हणू त्यांनी सनी लिओनचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला 

बंगळुरू : वृत्तसंस्था – बंगळुरू मध्ये बाॅलिवूडची अभिनेत्री सनी लिओन विरोधात आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे.  कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं हे आंदोलन केल्याचे समजते आहे. आंदोलकांनी सनी लिओनचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. इतकेच नाही तर सनी लिओनला बंगळुरूमध्ये येऊ देऊ नका अशी मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.
“वीर महादेवी” या तमिळ चित्रपटात सनीची मुख्य भूमिका आहे. सनीने वीर महादेवीची भूमिका साकारल्यामुळे कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज सोमवारी टाऊल हॉल इथं कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सनी लिओनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी घोषणाबाजी करत सनीचे पोस्टरही जाळले. तसंच सनी लिओनला कर्नाटकमध्ये पाय येऊ देऊ नका असा विरोधही संघटनेनं केला आहे.
दरम्यान कन्नड संघटनेच्या विरोधानंतरही सनी लिओन ३ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. इतकेच नाही तर पोलिसांनीही सनी लिओनला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परवानगीसुद्धा दिलीआहे. वीरामादेवी एक योद्धा होती आणि सनी लिओनने वीरामादेवींची भूमिका साकारून तिचा अपमान केला आहे, असं कन्नड संघटनेचं म्हणणं आहे. या अपमानामुळेच सनी लिओनला बंगळुरूमध्ये येऊ देऊ नका अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं केली आहे.
‘वीर महादेवी’ या आपल्या आगामी चित्रपटात सनी एका योद्धा महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी ती प्रशिक्षण घेतेय. घोडेस्वारी आणि तलवारबाजीही ती शिकत आहे.