संविधानाचे पालन करून सुजाण नागरिक बनावे : दिलीप आबा तुपे

पुणे – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी रक्त सांडले. आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामुळे आज भारत देशात स्वातंत्र्याची भव्य इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे लिखाण केले, त्या संविधानाप्रमाणे देशाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी संविधानाचे पालन करून सुजाण नागरिक बनावे, असे मत रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य दिलीप तुपे यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील साधना विद्यालयामध्ये 27 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचे वाचन करून तुपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य विजय शितोळे, जनरल बॉडी सदस्य अरविंद तुपे, विजय तुपे, ज्येष्ठ उद्योजक दशरथ जाधव, एस.एम.जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजसंचालन एन. सी. सी. ऑफिसर लालासाहेब खलाटे, क्रीडाशिक्षक रमेश महाडीक यांनी केले.

प्रतापराव गायकवाड व रूपाली सोनावळे यांनी प्रास्ताविक केले.