‘झटपट’ वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 6 बेडटाईम ड्रिंक्स घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आहार तज्ज्ञ (हेल्थ एक्सपर्ट) कायम सांगतात की झोपण्यापूर्वी हलके जेवण घ्यावे. झोपण्याच्या काही वेळ आधी तुम्ही काही खाल्यास तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका संभवतो.

शक्यतो झोपण्यापूर्वी 3 तास आधी जेवण करावे आणि झोपण्यापूर्वी काहीही खाऊ नये असा सल्ला दिला जातो. काही संशोधनानुसार जर तुम्ही वजन कमी करु इच्छित असाल तर काही खास पदार्थ झोपण्यापूर्वी खाल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होईल. संशोधकानुसार झोपण्यापूर्वी द्रव पदार्थ पिल्याने फक्त चांगली झोपच लागत नाही तर वजन देखील कमी होती.

योगर्ट प्रोटीन शेक –
योगर्ट प्रोटीन शेक पिल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. जर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करतात तर रात्री झोपण्यापूर्वी योगर्ट प्रोटीन शेक आवश्यक आहे. हे तुमच्या मास पेशींना मजबूत करते. मासपेशी जितक्या मजबूत कॅलरी तितक्या सहज कमी होतात.

कॅमोमाइल चहा –
कॅमोमाइल चहा सर्वात आरोग्यदायी ड्रिंक्स समजले जाते. कॅमोमाइल मेटाबॉलिज्म वाढवते. कॅमोमाइल ग्लूकोजला नियंत्रित करतो आणि वजन कमी करतो. कॅमोमाइल कार्बोहायड्रेट आणि साखर सहज पचवते.

रेड वाइन –
रेड वाइन पिणे आरोग्यासाठी चांगले नाही परंतु कमी प्रमाणात पिल्यास याचे काही फायदे देखील आहेत. यामुळे अँटीऑक्सीडेंट बॉडीच्या अतिरिक्त फॅटला एनर्जी फॅटमध्ये बदलेल. एनर्जी फॅट शरीरातील चबरी रोखतो.

केफिर –
केफिर हेल्दी प्रोबायोटिक लिक्विड डाएट आहे. हे दूधापासून बनते आणि कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत आहे. केफीर दह्यासारखे लागते. केफिरमध्ये मिळणारे प्रोबायोटिक्स मायक्रोबायोटा चांगले असते. यामुळे शरीरातील फॅटी अॅसिड वाढत नाही आणि वजन कमी होती.

सोया बेस्ड प्रोटीन शेक –
हा शेक तुमच्या शरीरासाठी चांगला आहे. यामुळे तुमचे वजन कमी होईल. रिसर्चच्या मते वेट लॉस प्रोग्राममध्ये सोया प्रोटीन शेक इतर स्त्रोताच्या बरोबरीने फायदेशीर आहे. सोयामध्ये अॅमिनो अॅसिडची जास्त असते ज्याने चांगली झोप लागते.

पाणी –
आतापर्यंतचे वरील जे ड्रिंक्स सांगितले त्यात कॅलरीचे प्रमाण थोडेफार असते परंतु पाण्यात झीरो कॅलरी असते. भरपूर पाणी पिण्याचे बरेच फायदे आहे. यातील मेटाबॉलिज्म योग्य प्रमाणात असते आणि याने त्वचा देखील चांगली होते.