काय सांगता ! होय, 16 नाही तर 24 डिग्रीवर चालणार तुमच्या घरातील AC, मोदी सरकारचा नवा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही गरमीपासून सुटका मिळण्यासाठी नवीन एसी खरेदी करणार असाल तर आता तो एसी 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार आहे. सर्व कंपन्यांच्या एसीमध्ये डिफॉल्ट टेंपरेचर 24 डिग्री असणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केल्या आहेत. नव्या वर्षात नव्या सेटींगसोबतच एसीचं मॅन्युफॅक्चरींग केलं जाणार आहे. सर्व ब्रँडच्या स्टार रेटींगवाल्या एसींना अधिसूचना देण्यात आल्या आहेत. हे नवीन नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू करण्यात आले आहेत.

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियंसी (BEE) सोबत मिळून सरकारने रुम एयर कंडिशनर्ससाठी एनर्जी परफॉर्मंस स्टँडर्ड निश्चित केले आहेत. BEEकडून स्टार रेटींग मिळवणाऱ्या सर्व रूम एअर कंडिशनर्ससाठी 24 डिग्रीची डिफॉल्ट सेटींग अनिवार्य करण्यात आली आहे. यावर्षी म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून हा नियम लागू होणार आहे. वीज बचतीसाठी सरकारने हा नियम केला आहे.

ऊर्जा बचत करणार डिफॉल्ट सेटींग

बीईईने फिक्स्ड स्पीड रुम एअर कंडिशनर्ससाठी 2006 मध्ये स्टार लेबलिंग प्रोग्राम लाँच केला होता. जो 12 जानेवारी 2009 मध्ये अनिवार्य करण्यात आला होता. यानंतर 2015 मध्ये इनव्हर्टर रुम एअर कंडिशनर्ससाठी वॉलंटरी स्टार लेबलिंग प्रोग्राम लाँच करण्यात आला. जो 1 जानेवारी 2018 रोजी लागू करण्यात आला. रूम एअर कंडिशनर्ससाठी स्टार लेबलिंग प्रोग्रामने 2017-18 या आर्थिक वर्षात 4.6 अरब युनिट ऊर्जेची बचत केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/