बीड : विहिरीत आढळला ‘स्प्लेंडर’सह दोघांचा मृतदेह, परिसरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बिंदुसरा नदीच्या पात्राजवळ काळे यांच्या मळ्यातील विहीरीत दोन मृतदेह आढळले होते. आज हे दोन्ही मृतदेह विहीरीबाहेर काढले. सदर तरूण हे बीड शहरातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिकलकर कुटूंबाने आरोपीला अटक करा असे म्हणत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, बीड शहरालगत असलेल्या कृष्ण मंदिराच्या जवळ आणि बिंदुसरा नदीपात्रा शेजारी असलेल्या काळे यांच्या मळ्यातील एका जुनाट आड वजा विहीरीतील पाण्यावर दोन मृतदेह तरंगत असल्याची माहिती काल शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु अंधार व जुनाट विहीर असल्यामुळे दोन्ही मृतदेह रात्री पाण्याच्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले नव्हते. आज पुन्हा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि दोन्ही मृतदेह बाहेर काढले तेव्हा दोघांचीही ओळख पटली.

बीड शहरातील शाहुनगर भागात राहणारा आकाश श्रीकृष्ण हरनाळे (वय 20) व हॉटेल अतिथीच्या मागे राहणारा कर्नल हिरासिंग शिकलकर (वय 19) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कर्नर हिरासिंग शिकलकर याच्या कुटूंबाने हा घातपाताचा प्रकार असून यातील आरोपींना अटक करा अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. एवढेच नव्हेतर त्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयातही ठाण मांडले होते.

दोघेही होते बेपत्ता

मयत आकाश श्रीकृष्ण हरनाळे हा बेपत्ता असल्याबाबत 14 जानेवारी 2020 रोजी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तर कर्नल हिरासिंग शिकलकर हा बेपत्ता असल्याची तक्रार 21 जानेवारी रोजी शिवाजी नगर पोलिस ठाण्यातच दाखल करण्यात आली होती. काल विहीरीतील मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी बेपत्ता असल्याबाबतच्या तक्रारींची माहिती गोळा करणे सुरू केले होते.

विहीरीत आढळली मोटार सायकल –

कुजलेल्या अवस्थेतील आकाश व कर्नल या दोघांचेही मृतदेह विहीरीच्या बाहेर काढल्यानंतर पोलिसांना विहीरीत एक मोटार सायकल असल्याचे आढळून आले. (एमएच 23 यु 3788) या क्रमांकाची हिरो होंडा, स्प्लेंडर मोटार सायकलही अग्निशामक दलाच्या जवानांनी विहीरीतून बाहेर काढली आहे. त्यामुळे मोटार सायकल विहीरीत कशी पडली. दोघेही मोटार सायकलवर होते की अन्य काही या बाबीचा उलगडा पोलिस तपासानंतरच होईल.

फेसबुक पेज लाईक करा –