बीड : अंतिम दिवसाअखेर 232 उमेदवारांचे एकूण 317 अर्ज प्राप्‍त

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर 2019 रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांत 152 उमेदवारांकडून एकूण 203 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांत 232 उमेदवारांकडून एकूण 317 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली.

शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर 2019 रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे –

228 गेवराई मतदारसंघातील 12 उमेदवारांची 16 नामनिर्देशन पत्रे, 229 माजलगांव 46 उमेदवारांची 64 नामनिर्देशन पत्रे, 230 बीड 41 उमेदवारांची 55 नामनिर्देशन पत्रे, 231 आष्टी 18 उमेदवारांची 22 नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत तर, 232 केज 11 उमेदवारांची 18 नामनिर्देशन पत्रे दाखल आणि 233 परळी 24 उमेदवारांची 28 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. अशी एकूण 6 विधानसभा मतदारसंघात 152 उमेदवारांकडून एकूण 203 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली.जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सहा मतदारसंघात 232 उमेदवारांची 317 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असल्याची माहिती संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

विधानसभा मतदारांघ निहाय नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत प्राप्त एकूण नामनिर्देशन पत्रांची संख्या –

228 गेवराई मतदारसंघातील 29 उमेदवारांची 43 नामनिर्देशन पत्रे, 229 माजलगांव 65 उमेदवारांची 91 नामनिर्देशन पत्रे, 230 बीड 54 उमेदवारांची 71 नामनिर्देशन पत्रे, 231 आष्टी 26 उमेदवारांची 33 नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत तर, 232 केज 17 उमेदवारांची 26 नामनिर्देशन पत्रे दाखल आणि 233 परळी 41 उमेदवारांची 53 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली.