बीड : ३ पोलीस निरीक्षक आणि ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हा पोलीस दलातील बदल्यांना वेग आला असून रविवारी (दि.३) ३ पोलीस निरीक्षकांसह ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी दिले.

पोलीस निरीक्षकांच्या बदलीत पोलीस नियंत्रण कक्षातील भाऊसाहेब गोंदकर यांची नेकूनर, देविदास शेळके यांची जिल्हा विशेष शाखेत तर जिल्हा विशेष शाखेचे कोंडीराम पाटील यांची धारूर ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

तसेच सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधिक्षक कार्यालयातील वाचक लक्ष्मण केंद्रे, बर्दापूरचे अजित विसपुते यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून तर येथील वाचक आनंद झोटे यांना युसूफवडगाव ठाणे देण्यात आले. दरोडा प्रतिबंधक पथकाचे श्रीकांत उबाळे आणि पिंपळनेर गजानन जाधव यांची खांदेपालट करण्यात आली. अंबाजोगाई शहरचे अमाले धस यांना स्थानिक गुन्हे शाखेत स्थान देण्यात आले. दरम्यान, प्रशासकीय कारणास्तव बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी दिले.

You might also like