Lockdown मध्ये बीड पोलीस दलातील अधिकाऱ्यासह एक पोलिस 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, सर्वत्र प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूच्या गाडी सोडण्यासाठी व पुढं मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना बीड पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे आणि पोलीस कर्मचारी माणिक तांदळे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना लाचलुचपत विभागाने आज संध्याकाळी लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.29) सायंकाळच्या सुमारास झाली आहे. या कारवाईने पोलीस दलामध्ये  खळबळ उडाली आहे.