३४ हजाराच्या लाच प्रकरणी २ कृषी सहाय्यकासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पाणलोट कंपार्टमेंट बंडीगच्या कामाचे ३ लाख ४० हजार रूपयाचे बील काढण्यासाठी ३४ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि एका खासगी व्यक्‍तीविरूध्द बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंजय जगन्‍नाथ औटे (४४, रा. लक्ष्मीनगर कॉलनी, नगर रोड, बीड), शेख महमंद तौफिक ईसाक (३२, रा. कामखेडा, ता.जि. बीड) आणि गोरक्षनाथ बबनराव भडके (३२, रा. कांबी, ता.जि. बीड) यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी दि. ११ जुलै रोजी तिघांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तिघांनी ३ लाख ४० हजार रूपयाचे बील काढण्यासाठी ३४ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द आज लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत औटे हे कृषी सहाय्यक असून त्यांच्याकडे सध्या मंडळ कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्‍त कार्यभार आहे. शेख महमंद तौफिक ईसाक हे देखील कृषी सहाय्यक आहेत. औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया आणि अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक हनपुडे पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधिकारी करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like