Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed ACB Trap | तक्रारदराच्या बाजूने लागलेल्या निकालाची प्रत (Copy of Result) काढून देण्यासाठी दीड हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) सहायक सरकारी वकील (Assistant Public Prosecutor) यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Beed ACB Trap) रंगेहात पकडले. बीड एसीबीने धारुरच्या न्यायालयातच (Dharur Court) ही कारवाई केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

धारुर न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकील सुरेखा लांब Sarika Lamb (वायबसे-Vybse) असे बीड एसीबीने लाच (Beed ACB Trap) घेताना पकडलेल्या महिला वकिलाचे (Female Lawyer) नाव आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Beed) तक्रार केली होती.

सुरेखा लांब (वायबसे) यांनी तक्रारदारास निकालाची प्रत काढून देण्यासाठी दीड हजार रुपये लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने बीड एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळणी केली. पडताळणीत निकालाची प्रत काढून देण्यासाठी 1500 रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. आज (मंगळवार) दुपारी सापळा रचून सुरेखा लांब यांना तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात (Dharur Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत
(Prevention of Corruption Act) सुरेखा लांब यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे (Deputy Superintendent of Police Shankar Shinde) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी (Police Inspector Ravindra Pardeshi) व त्यांच्या पथकाने
केली.

Web Title :-  Beed ACB Trap | Assistant government woman lawyer caught in anti-corruption net while taking Rs 1500 bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune-Purandar Airport | पुरंदर विमानतळाचे भूसंपादन एमआयडीसी कायद्यानुसार (MIDC Act)

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन दिल्ली दौरा करणार, रुम्स देखील बुक केल्या