Beed Accident | आजारी मुलाला दवाखान्यात घेवुन जाताना झालेल्या अपघातात आईसह एक जण जागीच ठार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  तापाना फणफणलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन दवाखान्यात निघालेल्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक दिली. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातील (Beed Accident) बीड-परळी मार्गावरील (beed parli highway) जरुड फाट्यावर 14 सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या समुरास झाला. बीडमध्ये (Beed Accident) झालेल्या या अपघातात (accident) दीर-भावजयचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षाच्या बाळासह त्याचे वडील थोडक्यात बचावले.

रवि नागोराव मिटकर Ravi Nagarao Mitkar (वय-26), सोनाली माधव मिटकर Sonali Madhav Mitkar (वय-30) अशी मयत दीर-भावजयची नावे आहेत. तर चालक विशाल अर्जुन मिटकर
Driver Vishal Arjun Mitkar (वय-27) हा जखमी झाला असून गौरव माधव मिटकर Gaurav Madhav Mitkar (वय-2) आणि माधव नागोराव मिटकर Madhav Nagarao Mitkar (वय-35 सर्व रा. घाटसावळी तांडा, बीड)) हे या अपघातातून थोडक्यात बजावले आहे.
गौरवला रात्री ताप आल्याने हे सर्वजण पहाटे तीन वाजता बीडकडे जीमधून (एमएच 06 एएस 4067) निघाले होते.

 

भूमकडून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच 25 एजे 3403) जात होती.
बीड- परळी मार्गावर जरुड फाट्यानजीक मालवाहू पिकअप चालकाचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, बोलेरो जीप (mahindra bolero) शंभर ते दीडशे मीटरवर जाऊन उलटली. यात जीपचा चक्काचूर झाला.
अपघातात रवी आणि सोनाली मिटकर यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
तर अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव व त्याचे वडील जीपमधून बाहेर झेपावले.
त्यामुळे ते सुरक्षित आहेत. अपघातात जीपचा चुराडा झाला असून पिंपळनेर पोलीस (Pimpalner Police) तपास करीत आहेत.

 

Web Title : Beed Accident | bolero jeep and tempo hit mother and cousin die on the spot at beed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 194 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Relationship | कलयुग ! विवाहित महिलेचं ‘एक्स बॉयफ्रेंड’सोबत ‘झेंगाट’, दिला 3 मुलांना जन्म; कारण ऐकून व्हाल ‘हैराण’

Supreme Court | SC चा वकीलांना भरपाई देण्यास नकार; दंड लावून म्हटले – ‘काळा कोट घालणारे सामान्य लोकांपेक्षा वेगळे नाहीत’