भरधाव वाहनाच्या धडकेने व्यायामासाठी गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून जाणार्‍या कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर आज (शनिवारी) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास व्यायाम करणार्‍या ३ विद्यार्थ्यांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तळेवाडी फाट्याजवळ घडली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुनिल प्रकाश थोटे (१४), तुकाराम विठ्ठल यमगर (१६) आणि अभिषेक भगवान जाधव (१४) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तिघेही गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील असून ते पहाटेच्या सुमारास गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर व्यायामासाठी गेले होते. त्यावेळी गढीकडून माजलगावकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागुन धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपुर्ण तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Loading...
You might also like