दुष्काळात बीडमध्ये टँकर माफियांचा कांकलेश्‍वर मंदिराच्या पाण्यावर ‘डल्‍ला’ : झाला ‘असा’ भीषण अपघात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीडची जनता दुष्काळात होरपळून निघत असून या ठिकाणी पाण्याची स्थिती भयावह बनली आहे. असे असताना बीडमधील कांकलेश्वर कुंडातून अवैधरित्या पाणी उपसा करत असताना टँकर कुंडामध्ये कोसळला. त्यामुळे टँकर चालकांकडून पाण्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.

कांकलेश्वर कुंडातून पाणी घेण्यासाठी आलेला टँकर कुंडामध्ये कोसळला. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. कुंडातून पाणी भरत असताना हा टँकर खाली कोसळल्याने या ठिकाणच्या पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आले. यामध्ये मंदीर पुजाऱ्याचा देखील हात असल्याची चर्चा आहे. मंदिराच्या पुजाऱ्याच्या संमत्तीने कुंडातील पाणी टँकर माफिया चोरून नेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. टँकर माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. टँकर माफियांचा हा धंदा दोन महिन्यांपासून सुरू असून आज घडलेल्या प्रकारामुळे पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणी पुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मात्र, टँकर माफिया अशा प्रकारे पाण्याची चोरी करून चढ्या भावाने पाण्याची विक्री करून बक्कळ पैसा कमावत आहेत. पाणी टंचाईमुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यातच कंकालेश्वर कुंडातून पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Article_footer_1
Loading...
You might also like