Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Accident News | राज्यात अपघाताचे सत्र काही थांबायचे नाव घेईना. आज सकाळी बीडमधील परळी या ठिकाणी अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये अंबाजोगाई पोलीस ठाण्याचे (Ambajogai Police Station) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके (Assistant Sub-Inspector of Police Rajebhau Shelke) यांच्या ७० वर्षीय आईला अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून परळीतील उड्डाणपूल परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. (Beed Accident News)

काय घडले नेमके?
आज सकाळी 8 वाजता अंबाजोगाई ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या आई प्रयागबाई बळीराम शेळके (वय वर्ष 70) या उड्डाणपूल परिसरात चालत जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत प्रयागबाई या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने परळीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या अपघातात मृत पावलेल्या प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या माघारी एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे
असा मोठा परिवार आहे. प्रयागबाई यांचं निधन झाल्याचं कळताच शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तसेच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर उड्डाणपूल परिसरात काही वेळासाठी
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर पोलिसांनी याची दखल घेत वाहतूक सुरळीत केली.

Web Title :- Beed Accident News | 70 year old mother of assistant police sub inspector dies in parli flyover accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Pune Crime News | रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन त्याने हिसकावला सोन्याचा हार; रंगावरुनच पोलिसांनी केले चोरट्याला जेरबंद