Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Accident News | राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. उलट ते दिवसेंदिवस वाढतंच चालले आहे. अशीच एक अपघाताची घटना (Beed Crime News) बीडमधील गेवराई तालुक्यातील गडी माजलगाव हायवेवर (Gadi Majalgaon Highway) काल सकाळी अर्धमसला शिवार रूई येथे घडली आहे. या अपघातानंतर काही तरुणांनी अपघातग्रस्त तरुणाला तातडीने उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात (Gevrai Upazila Hospital) दाखल केले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता. (Beed Accident News)

काय घडले नेमके?
कृष्णा विठ्ठल गायकवाड Krishna Vitthal Gaikwad (वय वर्ष 27, राहणार रूई तालुका गेवराई जिल्हा बीड) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुण हा छत्रपती संभाजीनगरला एका खाजगी कंपनीत काम करत होता. तो घटनेच्या दिवशी आपल्या मोटरसायकलवरुन बीडला परीक्षा देण्यासाठी जात होता. यादरम्यान अर्धमसला शिवारादरम्यान आला असता अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा अपघात (Beed Accident News) झाला. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला उपचारासाठी तात्काळ गेवराई जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यागोदरच या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे रुई गावात शोककळा पसरली आहे.

मृत कृष्णा गायकवाड हा अभ्यासात अत्यंत हुशार होता.
परीक्षांमध्ये तो नेहमी अव्वल असायचा, असं त्याच्या मित्रमंडळींकडून सांगण्यात येत आहे.
कृष्णाच्या अशा अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title :-  Beed Accident News | beed youth dies after car hits bike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Morning Drink | सकाळी चहा-कॉफीऐवजी ‘या’ ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करा, आरोग्य लाभ मिळतील

Flat Stomach Tips | बाहेर आलेले पोट जास्त मेहनत न करता कमी करायचे असेल, तर ‘हे’ आवश्य वाचा