Beed Accident News | माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 3 तरूणांचा जागीच मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Accident News | राज्यात अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. बीडमध्ये अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कार आणि बाईकचा अपघात होऊन 3 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. माजलगाव ते तेलगाव या रस्त्यावर (Majalgaon To Telgaon Road) हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील मृत तरुण हे लहामेवाडी येथील रहिवाशी होते. ते रात्री तेलगाव इथलं काम उरकून आपल्या घरी परतत होते यादरम्यान हा अपघात झाला. (Beed Accident News)

काय घडले नेमके?

लक्ष्मण सुभाष कापसे (32), नितीन भाऊसाहेब हुलगे (30) आणि आण्णासाहेब बळीराम खटके अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे तिघेही लहामेवाडी गावचे रहिवाशी होते. हे तिघेजण कापूस जिनिंगवर काम करत होते. आपले काम संपवून घरी परतत असताना माजलगाव-तेलगाव मार्गावर एका भरधाव कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. (Beed Accident News)

या अपघातात हे तिघेजण मोठ्या प्रमाणात जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
एकाच गावातील तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे माजलगाव तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माजलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Beed Accident News | car-and-two-wheeler-accident-in-beed-three-dead-on-the-spot-Beed-Majalgaon To Telgaon Road Accident News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pandharpur News | माघी वारीत उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यानं वारकर्‍यांना विषबाधा, 137 भाविक रूग्णालयात

Pune Crime News | खंडणीसह गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार उमेश वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 9 वी कारवाई

Mumbai ACB Trap | 15 लाख रुपये लाच घेताना वस्त्रउद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar On Pune Police | पुणे पोलिसांच्या ‘त्या’ निर्णयावर अजित पवारांची टीका; म्हणाले – ‘
…तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नयेत’ (VIDEO)