Beed Accident News | बीडमध्ये कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एकजण जखमी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Accident News | मित्राच्या लग्नाला जाणाऱ्या तरुणांवर काळाने हल्ला केला आहे. बीड येथे झालेल्या भीषण कार अपघातात (Beed Accident News) तीन तरुणांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर एक तरुण जखमी (Injured) झाला. त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महामार्ग गस्ती पथकाने अपघातग्रस्त कार हटवल्याने काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत झाली.

धीरज गुणदेजा (Dheeraj Gunadeja) (वय 30), रोहन वाल्हेकर (Rohan Walhekar) (वय 32), विवेक कानगुने (Vivek Kangune) (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (Anand Wagh) (वय 28) असे जखमीचे नाव आहे. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी असून बीडला त्यांच्या मित्राच्या लग्नाला जाताना हा विचित्र अपघात (Beed Road Accident) घडला.

याबाबत माहिती अशी की, बीडहून (Beed Road Accident) मध्यरात्री पेडगावच्या दिशेने जात असलेल्या कारवरचे नियंत्रण सुटल्याने घोसापुरी शिवारात भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Solapur National Highway) औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या
मारुती सुझुकी सियाज कारला मध्यरात्री घोसापुरी शिवारात भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार 3 वेळा उलटली.

Web Title : Beed Accident News | three killed on the spot one injured in a car accident in dhule solapur national highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globally

Rail Traffic Disrupted on Konkan Railway as Mega Block Hits Ratnagiri Route