Beed Accident News | स्पीड ब्रेकरवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Accident News | बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग 61 यावर एक भीषण अपघात घडला असून यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ट्रक-मोटारसायकलमध्ये हा भीषण अपघात झाला. मार्केट कमिटी नवीन मोंढा समोर स्पीड ब्रेकरवरून जाताना मोटारसायकलवरचा ताबा सुटल्याने मोटारसायकल समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. हि धडक एवढी गंभीर होती कि या अपघातात (Beed Accident News) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

 

काय आहे नेमके प्रकरण?
घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील शेख सलीम शेख अलीम (वय 33 वर्ष) हा तरुण माजलगाव या ठिकाणी एका लग्न समारंभासाठी गेला होता. हा लग्न समारंभ आटोपून तो मोटारसायकल क्र. एम.एच.21/बीडब्ल्यू 8186 वरुन मंगळवारी रात्री 12 वाजता परत आपल्या घरी निघाला होता. यादरम्यान तो शहरातील राष्ट्रीय महामार्ग-61 वर‌ असलेल्या मार्केट कमिटी, नवीन मोंढा समोर आला असता स्पीड ब्रेकर न दिसल्याने त्याचा मोटारसायकलवरचा ताबा सुटला व समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक क्र. एम.एच.-19/झेड 1921 च्या समोर आला आणि ट्रकला धडकला. हि धडक एवढी भीषण होती कि तरुणाचा जागीच मृत्यू झाला. (Beed Accident News)

 

या अपघाताची माहिती मिळताच माजलगांव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे व
अमोल कदम हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ट्रक ताब्यात घेतला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शिंदे वडगाव येथील शेख कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Web Title :- Beed Accident News | today beed man dies in accident after bike lost control on speed breaker rammed on truck

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WPL Title Sponsor | IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत केला 5 वर्षांचा करार

Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या