राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अमजद खान यांची निवड

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पत्रकार अमजद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व समाज बांधवांना त्यांचा हक्क, न्याय व मदत याद्वारे केलेल्या समाज कार्याची दखल घेत राज्याध्यक्ष संदिप लोंढे यांच्या हस्ते अमजद खान यांना नियुक्ती पत्र दिले आहे.

बीड येथील सायं दै. अभिमानचे उपसंपादक अमजद खान यांची राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व समाज बांधवांसाठी केलेल्या विधायक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाचे राज्य अध्यक्ष संदिप लोंढे यांनी ही नियुक्ती केली आहे. भारत सरकार अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे असुन त्यांच्या कार्याचे जाळे देशभर पसरलेले आहे.

जिल्हा उपाध्यक्ष पदी अमजद खान यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. राज्याध्यक्ष संदिप लोंढे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी , प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र ढवळे,पश्‍चिम महाराष्ट्र सचिव अनिल पारवडे, पुणे शहर अध्यक्ष रतन भिंगारदिवे, बीड जिल्हाध्यक्ष इम्रान पठाण, महासचिव रफीक पठाण, सचिव सुभाष देशमुख यांच्या सह जिल्हा भरातुन आलेले सर्व तालुका अध्यक्ष, सदस्य आदि मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –