बीड : शेतीच्या वादातून एकावर झोपेतच तलवारीने वार

फुले पिंपळगाव येथील घटना, रुग्ण 'गंभीर'

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या शेतीच्या वादातून शेतामध्ये असलेल्या झोपडीत झोपलेल्या तुकाराम गिरगुणे यास तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गिरगुणे अति गंभीर असल्याने उपचारासाठी शास्त्रीक्रिया विभागात घेण्यात आले आहे.

माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील तुकाराम नारायण गिरगुणे (वय 50) हे त्यांच्या शेतातील झोपडीमध्ये झोपले असताना गावातीन काही व्यक्तींनी तू घेतलेली 8 वर्ष्यापूर्वी जमीन त्याच भावांमध्ये आम्हाला दे म्हणत आणि झोपडीवर एकटा असल्याची संधी साधून तिघा जणांनी तलवारीने वार केले. यात तुकाराम यांच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर वार असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचार सुरू केले आहेत.