‘ती’च्यामुळे नापास झालेल्याने तिलाच मागितली वर्षभराची फी ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमासाठी कायपण म्हणत तरुणाई लव्ह अफेयरमध्ये व्यस्त असतात. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. प्रेमाची ताकद खुप असते असं म्हटलं जातं. परंतु बीड जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणानं त्याच्या अपयशाचं खापर चक्क प्रेयसीवर फोडलं. नापास झाल्याने चक्क प्रेयसीला जबाबदार धरत तिच्याकडे वर्षभराच्या फी ची मागणी करत तिला त्रास दिला. त्यामुळे त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तो बीएएमएसचे शिक्षण घेतो. दरम्यान गेल्या वर्षी आपल्याच वर्गात शिकणाऱ्या एका तरुणीवर त्याचा जीव जडला. इथे त्याची लव्ह स्टोरी सुरु झाली. वर्षभर तो तिच्या प्रेमात चक्क वेडा झाला. त्याला जळी, स्थळी प्रेयसीशिवाय कुणी दिसत नव्हतं. याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला. त्यामुळे तो नापास झाला. त्यानंतर त्याने नापास झाल्यावर थेट प्रेयसीलाच जबाबदार ठरवत.

तुझ्या मागे वेळ गेला फि चे पैसे दे

नापास झाल्यावर तरुणाने चक्क तिला जबाबदार धरले. तुझ्यामुळे माझा वेळ वाया गेला. अभ्यास करता आलेला नाही. मी नापास होण्याला तूच जबाबदार आहेस. म्हणून माझ्या बुडालेल्या वर्षभराच्या फि टे पैसे तूच दे असा तगादा त्याने तिच्याकडे लावला. त्यानंतर त्याने तिला वाटेल तेव्हा फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तिने फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाविरोधात फसवणूक आणि पैसे वसूलीचा गुन्हा दाखल करून अटक केली.

Loading...
You might also like