ऊसतोड मजुरांच्या मुद्यावरून बीडमध्ये आता पंकजा मुंडे आणि सुरेश धस ‘आमने-सामने’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ऊसतोड मजूर आंदोलनाच्या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) आणि आमदार सुरेश धस ( suresh dhas) आमने – सामने आल्याचे दिसून येत आहे. ऊसतोड मजुरांचा (sugarcane workers) संप मागे, असं म्हणत दर वाढ दिली नाही तरी कोयता उचलून तोडणीला जाण्याचे आदेश भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस यांनी 150 टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे बीडमध्ये भाजप पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.यामुळे उसतोड कामगारांच्या आंदोलनात फूट पडल्याचे दिसत आहे.

अंबेजोगाई येथील आज कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात मोठी घोषणा केली. मुंडे म्हणाल्या की, आमच्या ऊसतोड कामगारांना 150 टक्के, 100 टक्के, 70 टक्के वाढ नको तर कमीत कमी प्रति टनाला 21 रुपये वाढ द्या, असे आवाहन पवार साहेबांना केलं आहे. आमच्या ऊसतोड कामगारांना उद्या भगवान बाबांचे दर्शन घेऊन ऊसतोड करण्यासाठी कारखान्याला गाड्या भरण्याचे आदेश दिले आहेत. मुंडे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. आम्ही कधीही त्यांच्या आवाहनाला बळी पडणार नाही, अशी भूमिका घेत पुणे येथील 27 तारखेच्या बैठकीची प्रतीक्षा करण्याचे आमदार धस यांनी केले आहे.