Beed Crime | छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; बीडमध्ये जिल्ह्यात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  Beed Crime | बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक (Beed Crime) घटना समोर आली आहे. छेडछाडीला कंटाळून एका 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केल्याची घटना घडली आहे. संबधित मुलीनं विष प्राशन (Poison) करुन तिने आपलं जीव संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवार (22 ऑक्टोबर) रोजी घडली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

 

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी इयत्ता 8 वीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा सतत तिची छेड काढत असे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने याबाबत आपल्या घरच्यांना सांगितले. यानंतर घरच्यांनी त्या मुलाला जाब विचारुन ताकीद देखील दिली. सतत होणा-या छेडछाडीला कंटाळून पीडित मुलीने विष प्राशन (Poison) केलं. यानंतर त्या मुलीला उपचारासाठी बीडमधील खासगी रुग्णालयात (Private hospital) दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर (Beed Crime) येत आहे.

 

या दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणात तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. या प्रकऱणी पिंपळनेर पोलीस (Pimpalner Police) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Beed Crime | 14 year old girl drinks poison to commit suicide over eve teasing in beed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan Samman Yojana | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना दिवाळीची मोठी भेट ! PM Kisan योजनेची रक्कम दुप्पट होणार?

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’च्या स्कीममधून देखील जमा करू शकता 1 कोटी रुपये; दरमहा करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या

Atmanirbhar Bharat Abhiyan | देशाच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला मोदी सरकारची मोठी भेट ! 7 मेगा टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेची अधिसूचना जारी

Mumbai Pune Expressway Accident | ‘तो’ अपघात नव्हे ! 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं? पोलीस तपासातुन ‘पर्दाफाश’

National Short Film Festival | 14 व्या ‘प्रतिबिंब’ राष्ट्रीय लघुपट महोत्सवात लोडिंग पिक्चर्स निर्मित ‘डे झीरो’ ठरला प्रथम