Beed Crime | धक्कादायक ! ऊसाला आग लावून 32 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव (Hingangaon) येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना (Beed Crime) घडली आहे. धक्कादायक म्हणजे या शेतकऱ्याने ऊस कारखान्याकडे जात नसल्याने ऊसाला आग लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार दुपारी 12 च्या सुमारास घडली. नामदेव आसाराम जाधव (Namdev Asaram Jadhav) (वय 32, रा. हिंगणगाव, ता. गेवराई) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

 

याबाबत माहिती अशी की, नामदेव जाधव यांच्याकडे तीन एकर जमीन आहे. त्यापैकी एक एकरमध्ये उसाचे पीक आहे. ऊस तोडणीला आला असताना ऊस कारखान्याला जात नाही, याच नैराश्यातून त्यांनी आधी उसाला आग लावली. त्यानंतर त्याठिकाणीच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. जाधव यांनी बँकेचे आणि खासगी कर्ज घेतल्याचे सांगितले जात आहे. (Beed Crime)

दरम्यान, नैराश्यात असलेल्या जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले.
त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.
याप्रकरणी अधिक तपास गेवराई पोलिस (Gevrai Police) करीत आहेत.

 

Web Title :- Beed Crime | beed-32 years old farmer commits suicide by setting fire to sugarcane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा