Beed Crime | CBI अधिकारी असल्याचे सांगून वृद्धांना लुटणारा भामटा गजाआड

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | सीबीआय अधिकारी (CBI Officer) असल्याची बतावणी करुन वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या (Robbing Senior Citizens) भामट्याला बीड पोलिसांनी (Beed Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहे. बीड जिल्ह्यातील (Beed Crime) गेवराई (Gevrai) येथे मागील अनेक दिवसांपासून वृद्धांसह, महिला व नागरिकांना लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तोतया सीबीआय अधिकाऱ्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्याचा साथीदार पळून गेला.

 

बीडच्या (Beed Crime) गेवराई मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धांसह, महिला व नागरिकांना लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपुर्वीच एका वृद्ध व्यक्तीला शहरातील जुने बसस्थानक (Old Bus Stop) परिसरात सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत भरदिवसा लुटण्यात आले होते. नंतर काही दिवस लोटताच पुन्हा या भामट्यांनी शहरातील मोंढा परिसरात (Mondha Area) एका वृद्ध व्यक्तीला धमकावून पैसे व सोन्याच्या वस्तु लुटल्या. मात्र तेथील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच नागरिकांनी दोघांपैकी एका भामट्यास पकडून ठेवले व एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

 

जमावाने पकडलेल्या आरोपीस बेदम मारहाण (Beating) केली व नंतर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच या भामट्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
गेवराई पोलिसांनी (Gevrai police) आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असुन या प्रकरणाचा पुढील तपास तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे (API Praful Sable) व टिम करत आहे.

 

Web Title :- Beed Crime | Beed Police Arrest Bogus CBI Officer

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा