Beed Crime | बीडमध्ये राष्ट्रवादीचा नवनिर्वाचित नगरसेवक निघाला ‘पुष्पा’, पोलिसांकडून FIR; शहरात प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायत निवडणुकीचा (Kej Nagar Panchayat Election) एकीकडे जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे केजमधील राष्ट्रवादीचा (NCP) नवनिर्वाचित नगरसेवक (Corporator) चंदन तस्कर (Sandalwood Smuggler) निघाला आहे. चंदन तस्करी प्रकरणात केज नगरपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यासह तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये (Beed Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे.

नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवरांकडून विजयाचा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र, बीडच्या एका नवनिर्वाचित (Newly Elected) नगरसेवक विरोधात चंदन तस्करी प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या (Ambajogai Rural Police Station) हद्दीत चंदन तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जाधव (Balasaheb Jadhav) असे या नगरसेवकाचे नाव आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या सोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Beed Crime)

पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन बाळासाहेब दत्तात्रय जाधव त्यांच्या साथीदारांसह आंबेजोगाई तालुक्यातील वाघाळा शिवारात (Waghala Shivar) अंबा साखर कारखाना (Amba Sugar Factory) जवळील देवकर कुंडकर यांच्या शेतातील पत्र्याचे शेड मध्ये चंदनाच्या झाडाची चोरी करुन झाड व झाडेचे खोड तपासून गाभा काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाई केली असता 27 किलो चंदनाचा गाभा पकडला.
याची किंमत 67 हजार 500 रुपये असून या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवराव भानुदास कुंडकर (Devrao Bhanudas Kundkar),
बाळासाहेब दत्तात्रय जाधव आणि सतीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Beed Crime | case filed against ncp corporator in sandalwood smuggling case in beed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या