Beed Crime | एका रात्रीत असं काय झालं? नामांकित क्लासेस चालकाने केली आत्महत्या, नैराश्य की आणखी काही?, बीड शहरात खळबळ

Beed Crime | coaching class owner Rajaram Dhas commits suicide by hanging in beed crime news in marathi
File Photo

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | बीड शहरातील नामांकित क्लासेस चालकाने (Coaching Class Owner) राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आले होते. ही घटना नैराश्यातून (Depression) घडली की आणखी काही कारण आहे? याचा तपास सध्या पोलीस (Beed Police) करीत आहेत. राजाराम धस Rajaram Dhas (वय-40 रा. नाथसृष्टी, बीड) असे आत्महत्या केलेल्या क्लास चालकाचे (Beed Crime) नाव आहे.

 

राजाराम धस हे बीड शहरामध्ये (Beed Crime News) गेल्या वीस वर्षापासून खासगी क्लासेस चालवत होते. मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे रहिवासी असून त्यांचे वडील पोलीस दलात कार्यरत असल्याने ते बीड शहरात (Beed Crime) राहण्यास आहेत. काही वर्षे शहरातील जिज्ञासा करिअर अकॅडमी (Jidnyasa Career Academy) मध्ये शिक्षक (Teacher) म्हणून काम केल्यानंतर त्यांना आठ वर्षापूर्वी शहरातील अंकुश नगर भागात स्वत:च ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले होते.

 

राजाराम धस यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत निघून गेले. मात्र, तीन वाजता त्यांचा लहान भाऊ उठला असता एका बंद असलेल्या खोलीचा दरवाजा त्याला उघडा दिसला. त्याने आत जाऊन पाहिले असता राजाराम यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि राजाराम धस यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospital, Beed) शवविच्छेदनासाठी पाठवला.

 

दोन दिवसांपूर्वी केलं नवीन शाखेचं उद्घाटन

राजाराम धस यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही.
यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई-वडील असा परिवार आहे.
दोन दिवसांपूर्वी धस यांनी शहरामध्ये एका नवीन खासगी क्लासेसच्या शाखेचे उद्घाटन केले होते.
त्यांनी जागा घेऊन हे क्लासेस उभे केले, मात्र, एका रात्रीतच असं काय झालं?  की त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली.
याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी रुग्णालयात गर्दी केली.

 

Web Title :- Beed Crime | coaching class owner Rajaram Dhas commits suicide by hanging in beed crime news in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’