Advt.

Beed Crime | धक्कादायक ! ‘तू मला पसंत नाहीस’ म्हणत महिन्याभरातच ‘तलाक’ देऊन पत्नीला पेटवलं

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime | दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बीड (Beed Crime) जिल्ह्यामध्ये घडली आहे. या घटनेत एका नवविवाहित महिलेचा छळ करुन मग तिला पेटवून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

हाती आलेल्या माहितीनुसार, बीड (Beed Crime) शहरातील मामला परिसरामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या सरफराज मोमीन (Sarfaraz Momin) नावाच्या मुलाचा गेल्या महिन्यातच विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सरफराज आणि सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेचा छळ सुरू करण्यात आला. यानंतर पीडित महिलेने हा सर्व प्रकार आपल्या माहेरच्यांना सांगितला. यानंतर दोन्ही कुटुंबात यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर शुक्रवारी सरफराज याने आपल्या पत्नीला तोंडी तलाक (Divorce) दिला.

यानंतर सरफराज याने आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून पत्नीवर पेट्रोल ओतले आणि मग तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान पीडित महिलेचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी मुलीचे प्राण वाचवले.
या सर्व घटनेमुळे संपूर्ण बीड (Beed Crime) हादरले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आपल्या सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती सरफराज आणि त्याच्या
इतर कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Beed Crime | man sets wife on fire saying i do not like you after month of marriage in beed city marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T10 League | मुंबई इंडियन्सच्या ‘या’ माजी बॉलरने इतिहास रचत 12 बॉलमध्ये घेतल्या 5 विकेट्स

Provident Fund Account | मार्च महिन्यात निवृत झाले आणि एप्रिलमध्ये PF काढला, तर एप्रिलचे व्याज मिळेल का? जाणून घ्या

Puneet Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे 23 नोव्हेंबर पासून आयोजन

Maharashtra Primary Schools Reopen | राज्यातील 1 ली ते 5 वी पर्यंत शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या प्रमुखांचे मोठं वक्तव्य, म्हणाले….

Sofia Urista | धक्कादायक ! Live प्रोग्राममध्ये ‘या’ गायिकेनं चक्क पुरुष चाहत्याच्या तोंडावर केली ‘लघुशंका’