Beed Crime | धक्कादायक! बीडमध्ये महिला नायब तहसीलदार यांना पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | बीड जिल्ह्यतील केजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केजच्या नायब तहसीलदार (Naib Tehsildar Beed Kaij) आशा वाघ (Asha Wagh) यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न (Attempt to Burn) करण्यात आला. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार (Beed Crime) सुरु आहेत.

 

कौटुंबिक वादातून (Family Dispute) आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता. ही घटना शुक्रवारी (दि.20) दुपारी चारच्या सुमारास घडली. आशा वाघ या केज तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) नायब तहसीलदार आहेत. भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. (Beed Crime)

 

नायब तहसीलदार आशा वाघ शुक्रवारी दुपारी जेवण करुन तहसील कार्यालयाकडे मोपेडवरुन येत होत्या.
त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता आडवला.
त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधून आणलेले पेट्रोल वाघ यांच्यावर टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्यात आशा वाघ थोडक्यात बचावल्या. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे.

 

Web Title :- Beed Crime | naib tehsildar beed kaij asha wagh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना