Beed Crime News | 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह; नेमके काय आहे प्रकरण?

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | बीडमधील मोहखेड तालुका धारूर येथील महेश लक्ष्मण सोळंके हा तरुण 7 मार्चपासून बेपत्ता होता. त्याच्या वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर गावाकडेच्या एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. (Beed Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?

मोहखेड तालुका धारूर येथील महेश लक्ष्मण सोळंके हा तरुण 7 मार्चपासून बेपत्ता होता. घरातून शौचास जातो म्हणून बाहेर पडला तो परत घरी परतलाच नाही. आई-वडिलांसह गावकऱ्यांनी देखील त्याचा शोध घेतला मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. यानंतर वडील लक्ष्मण सोळंके यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात महेश लक्ष्मण सोळंके (वय वर्ष 25) हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीदेखील त्याचा शोध घेतला पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. (Beed Crime News)

अखेर 10 मार्च रोजी सायंकाळच्या वेळी एका व्यक्तीला त्यांनी शौचास जाताना जो डब्बा घेऊन गेला होता तो डब्बा एका ठिकाणी विहिरीच्या बाजूला आढळून आला. यानंतर त्यांनी लगेचच गावकऱ्यांसह लक्ष्मण सोळंके यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी महेशच्या वडिलांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली.
मृतदेह कुजलेला असल्याने पोलीस प्रशासनाने विहिरीच्या बाजूलाच त्याच्यावर
शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र महेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
त्याने आत्महत्या केली त्याचा खून झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
महेशच्या अकाली मृत्यूने सोळंके कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे.

Web Title :  Beed Crime News | 25 years old youth found dead in well

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बसस्टॉपवर मैत्रिणीचा घेतला कीस; लग्न केले नाही तर जीव देण्याची दिली धमकी

Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन

Pune Cyber Crime News | माजी खासदार निलेश राणे यांना अपमानास्पद शिवीगाळ, बदनामी केल्याचा प्रकार; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Jalna Accident News | लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या वृद्ध पती-पत्नींचा अपघातात मृत्यू; मुलीची भेट राहिली अपूर्ण

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर