Beed Crime News | पहाटेच्या वेळी घराची कडी वाजली अन् तिनं दार उघडलं; थोड्याच वेळात तिचा ‘घात’ झाला आणि झालं आयुष्य ‘उध्वस्त’

बीड / परळी : पोलीसनामा ऑनलाइन – एका तरुणाने विवाहित महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parali) याठिकाणी घडली आहे. आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून त्या विवाहित महिलेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणावरून पीडित महिलेने आरोपीविरुद्ध सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये (Sirsala Police Station) फिर्याद दिली आहे. Beed Crime News accused come early morning at victims home and raped her parali vaijnath beed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याबाबत अधिक माहितीनुसार, ही घटना परळी तालुक्यातील सिरसाळानजीकच्या खामगाव येथील आहे.
लहु लिंबाजी घडवे (Lahu Limbaji Ghadve) असे त्या आरोपीचे नाव आहे.
तर, घरात कुणी नसल्याचं बघून आरोपी तरुण 28 जूनच्या पहाटे 4 वाजता पीडित विवाहित महिलेच्या घरी पोहोचला.
त्यानं दरवाजा ठोठावला. नवरा आला असल्याचं समजून पीडित महिलेनं भल्या पहाटेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडला.
मात्र दारात गावातील लहु घडवे हा तरुण उभा होता.
त्यानं एकट्या महिलेला बघून जबरदस्तीनं तिच्या घरात घुसून. ‘गावात राहू देणार नाही’ अशी धमकी देत त्यानं पीडित विवाहित महिलेवर बलात्कार केला.
हि घटना कुठे न सांगता धमकी Threat दिली. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Corona News | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 269 नवीन रुग्ण, 220 रुग्णांना डिस्चार्ज

या दरम्यान, पीडित विवाहित महिलेनं दुसऱ्या दिवशी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये (Sirsala Police Station) जाऊन आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा Crime दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी लहु लिंबाजी घडवे याच्याविरुद्ध भा.दं.वि. 376 आणि 506 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा आगामी तपास पोलीस करीत आहेत.

Web Titel : Beed Crime News accused come early morning at victims home and raped her parali vaijnath beed