Beed Crime News | दुर्देवी ! विजेचा धक्का लागल्याने 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विजेचा धक्का (Electric Shock) लागून एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. बीड शहरातील कसबा भागामध्ये ही हृदय हेलावणारी घटना घडली आहे. हि घटना लक्षात येताच या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याअगोदरच तिचा मृत्यू झाला होता. (Beed Crime News)

काय घडले नेमके?

नळाला पाणी आल्याने अठरा वर्षीय विद्यार्थिनीने मोटर लावली असता यावेळी तिला विजेचा जबरदस्त शॉक बसला आणि यामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बीड शहरातील कसबा भागामध्ये घडली आहे. कोमल रामेश्वर शिंदे असे शॉक लागून मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. इलेक्ट्रिक शॉक बसताच कोमलने जोरदार किंकाळी मारली. तिचा आवाज ऐकताच घरातील लोक धावत तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता. कोमल रामेश्वर शिंदे हि इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती अभ्यासात अत्यंत हुशार होती. आपल्या तरुण मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Beed Crime News)

पिता- पुत्रांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वी उस्मानाबादमध्ये विजेचा धक्का लागून पिता- पुत्रांना आपला जीव गमवावा लागला होता.
शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा विजेचा धक्का
लागून जागीच मृत्यू झाला होता. हि दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव
या ठिकाणी घडली आहे. शरणाप्पा अर्जुन जमादार (वय 52वर्षे), गणेश जमादार (वय 16) वर्षे मृत पावलेल्या
दुर्दैवी पिता-पुत्रांची नावे आहेत. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मृत शेतकरी शरणाप्पा जमादार यांच्या माघारी आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Web Title :-  Beed Crime News | beed 18 years old girl student dies of electric shock while filling water with motor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणारं…’, उद्धव ठाकरेंचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला