Beed Crime News | खरेदीहून येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू

0
663
Beed Crime News | beed lady police constable dies after truck hits bike
file photo

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime News | संक्रातीनिमित्त मैत्रीणींना हळदी कुंकवासाठी घरी बोलावल्याने वाणाचे सामान आणून घरी परत येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात (Beed Accident News) झाला आहे. (Beed Crime News)

माया श्याम जाधव (42, मुळ रा. लिंबागणेश, सध्या रा. धांडेनगर, बीड) असे मृत्यू झालेल्या महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्या बीड पोलिस दलातील (Beed Police) पेठ पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदावर कार्यरत होत्या. माया यांचे पती श्याम जाधव हे बीड पोलिस उपाधीक्षक कार्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. (Beed Crime News)

माया जाधव यांनी घरी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी वाण आणण्यासाठी त्या आणि त्यांचे पती मोटारसायकलवरून खरेदीसाठी बोहर गेले होते. परत येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये माया जाधव या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दि. 20 जानेवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title :-  Beed Crime News | beed lady police constable dies after truck hits bike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीवर बोलले अजित पवार; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Kiara Advani | कियारा अडवाणीने सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल केला मोठा खुलासा

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या; विरोधात नर्स संघटनांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार