Beed Crime News | भाजप पदाधिकाऱ्याची भरदिवसा कोयत्याने वार करत हत्या; घटनेने बीडमध्ये खळबळ

Beed Crime News | BJP office bearer stabbed to death with a sickle in broad daylight; The incident created a stir in Beed

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | भाजप पदाधिकाऱ्याची धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. माजलगावच्या कीट्टी आडगाव येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास आगे यांची धारधार कोयत्याने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. याप्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

Total
0
Shares
Related Posts