बीड : Beed Crime News | पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गणेश शेंडगे असे जीवनयात्रा संपवलेल्या पतीचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील कासारी येथे ही घटना घडली. (Suicide Case)
अधिक माहितीनुसार, गणेश शेंडगे आणि ऋतुजा यांचा गेल्या काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ऋतुजा आणि अक्षय पडोळे नामक तरुणाचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती काही दिवसांनी गणेश शेंडगे याला समजली मात्र स्वतःच्या मुलाचा विचार करून त्याने आणि नातेवाईकांनी ऋतुजासह अक्षय पडोळेला समजावून सांगितले. मात्र, तरीही अक्षय पडोळे आणि ऋतुजाने अनैतिक संबंध कायम ठेवले.
मंगळवारी ६ मे रोजी सकाळी गणेश शेंडगे हा घरी असताना पत्नीच्या मोबाईलवर पुन्हा अक्षय पडोळेचा फोन आला. यामधून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून गणेश शेंडगेने घरातच गळफास लावून जीवन संपवलं. ही संपूर्ण घटना ऋतूजा हिने कोणालाही सांगितली नसल्याचा आरोप गणेश शेंडगे याचा भाऊ दशरथ शेंडगे यांनी फिर्यादीमध्ये केला आहे.