Beed Crime News | बीड हादरलं ! अंध आईसोबत भीक मागणाऱ्या चिमुरडीवर नराधमाकडून अत्याचार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. लहान मुलांवरील अत्याचारांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. बीडमधून लहान मुलांवरील अत्याचाराची अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड हादरला आहे. यामध्ये एका नराधमाने आईसोबत भीक मागणाऱ्या अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले आहेत. आरोपीदेखील अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. (Beed Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?

पीडित तीन वर्षांची मुलगी आईसोबत बसस्थानक आणि परिसरात भीक मागते. पीडितेची आई अंध असून 21 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता आई बेकरीसमोर बसलेली होती. यावेळी तीन वर्षांची चिमुरडी तिच्या अवतीभोवती खेळत होती. यादरम्यान एका 14 वर्षीय मुलाने तिला 20 रुपयांची नोट दाखवून स्वत:जवळ बोलावले आणि त्यानंतर तिला छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मागील प्रवेशद्वारातून आतमध्ये नेले. त्याठिकाणी पडलेल्या एका गमछाने तिचे हात बांधले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. (Beed Crime News)

यावेळी मुलीच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून त्या ठिकाणी आलेल्या तरुणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. काही लोक आपल्याकडे येत असल्याचे समजताच आरोपीने घटनास्थवरून पळ काढला. यावेळी तरुणांनी संशयित मुलाचा पाठलाग केला. परंतु तो हाती लागला नाही. यानंतर पीडित मुलगी रडत आईकडे गेली. यावेळी तिच्या वस्त्रावर रक्ताचे डाग होते. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यावर आईने रागात तिला दोन चापटा मारल्या आणि पुन्हा प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर माय-लेकी बसस्थानकामागील स्वच्छतागृहाजवळ अंधारात विसावल्या. या घटनेची माहिती बीड पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित मुलीचा आणि तिच्या आईचा शोध घेतला. यानंतर मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

यानंतर पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपी मुलावर बलात्कार,
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा केला आहे.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार कैलास ठोंबरे,
मनोज वाघ, नसीर शेख, अशोक दुबाले, विकास वाघमारे, रामदास तांदळे, सतीश कातखडे यांनी तातडीने पाऊले उचलत त्या आरोपी अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Web Title :- Beed Crime News | rape-on-3-year-begging-in-beed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस वसाहतीमधून पोलिसाची दुचाकी चोरीला, पोलीस वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nawazuddin Siddiqui | अखेर नवाजुद्दीन सिद्दिकीने पत्नी आलियाने केलेल्या आरोपांवर सोडले मौन; म्हणाला – ‘माझ्या मुलांचे नुकसान …’

Hera Pheri 3 |अखेर पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी राजू, शामसोबत बाबू भैय्या सज्ज; ‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला झाली सुरुवात