Beed Crime News | बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; बीडमधील घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | बीड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखान्यामध्ये (Mahesh Sugar Factory) हि दुर्दैवी घटना घडली आहे. काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कारखान्यातील इतर कर्मचारी आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. (Beed Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कल्याण गणपती टोले (वय वर्ष 40) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कल्याण गणपती टोले हे आनंदगाव येथील रहिवासी होते. डोले तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखाना म्हणजेच शुगर इंडस्ट्रीमध्ये ते काम करत होते. मागच्या काही दिवसांपासून कारखान्यातील काही मशिनरींची दुरुस्ती करण्याचे काम सुरु होते. नादुरुस्त मशिनरी व्यवस्थित करण्यासाठी रात्रीच्या वेळेला हे काम चालू होतं. मात्र रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कल्याण टोले हा बॉयलर जवळ काम करत होता. यावेळी अचानक मशीनचा पट्टा चालू झाल्याने कल्याण या मशिनच्या पट्ट्याकडे ओढला गेला आणि त्यामध्ये अडकून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Beed Crime News)

ही घटना आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना कळतात मशीन तात्काळ बंद करण्यात आली.
यानंतर कल्याणला प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.
कल्याण टोले यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे आनंदगावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Beed Crime News | today beed jay mahesh sugar factory labor dies after stuck in boiler belt while repairing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Swapnil Joshi | मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने व्यक्त केली खंत; म्हणाला ‘या’ अभिनेत्रीबरोबर करायचे होते काम