×
Homeक्राईम स्टोरीBeed Crime | दुर्देवी ! जेवण करून घराबाहेर फिरत असताना भरधाव जीपने...

Beed Crime | दुर्देवी ! जेवण करून घराबाहेर फिरत असताना भरधाव जीपने 2 सख्ख्या बहिणींना चिरडलं

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस (Beed Crime) आली आहे. दोन्ही बहिणी रात्रीचं जेवण करून घरासमोर शतपावली करत होत्या. मात्र त्यावेळी काळाने घाला घातला आहे. त्यावेळी विरुद्ध दिशेनं आलेल्या जीपने दोघींना जोरदार धडक दिली. जीपने धडक दिल्याने दोन्ही बहिणी 200 ते 300 फुटापर्यंत गाडीसोबत फरफटत (Accident) गेल्या. यानंतर दोघींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवलं. मात्र तत्पुर्वी दोघींचा दुर्देवी मृत्यू (Died) झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ वक्त होत आहे.

 

याबाबत माहिती अशी, रोहिणी महारुद्र गाडेकर (Rohini Maharudra Gadekar) (वय, 23) आणि मोहिनी महारुद्र गाडेकर (Mohini Maharudra Gadekar) (वय, 27) असं अपघातात मृत झालेल्या दोन बहिणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील धनगर जवळका गावातील या रहिवासी होत्या. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर 8.30 च्या सुमारास दोन्ही बहिणी घरासमोर शतपावली करत होत्या. यावेळी विरुद्ध दिशेनं आलेल्या भरधाव जीपने या दोन्ही बहिणींना चिरडलं आहे. (Beed Crime)

 

 

दरम्यान, या दोघींशिवाय समोर दुचाकीजवळ उभ्या असलेल्या अन्य 2 तरुणांनाही जीपने धडक दिली.
या अपघातात (Accident) जखमी तरुणाच्या डोक्यात 7 टाके पडले आहेत.
हा तरुण वाढदिवस साजरा करून आपल्या 4 मित्रांसोबत दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभा होता.
यावेळी जीप चालकाने त्यालाही धडक दिली. या अपघातानंतर चालकाने पळ काढला.
यानंतर जखमी तरुणांसह दोन्ही बहिणींना तातडीने पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
पण दोन्ही बहिणींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितलं.
मात्र नेत असताना दोंघीचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी संबधित गाडी जप्त केलीय. पुढील कारवाई पोलिस (Police) करीत आहेत.

 

 

Web Title :- Beed Crime | Rohini and mohini Maharudra Gadekar two sister died in terrible accident while went to walk beed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News