Beed Crime | धक्कादायक ! चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांचे गैर कृत्य; नातेवाईक आक्रमक

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | बीड शहरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांनी गैर वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (Teacher Misbehaving With Girl Student). यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय (Beed Crime). प्रत्यक्ष पोलिसांनी (Beed Police) घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

 

शिक्षका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शाळा व्यवस्थापन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शाहेदखान कासम पठाण (Shahid Khan Kasam Pathan) असं या शिक्षकाचे नाव आहे. आम्ही कोणाच्या भरोशावर मुलींना शाळेत पाठवायचं असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे लाखों रुपयाची ट्यूशन फीस विद्यार्थ्यांकडून घेणारे संस्थाचालक मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजना बाबतीत मात्र हलगर्जीपणा करत असल्याचे या प्रकारांमध्ये दिसून आले. ज्या चौथीच्या वर्गामध्ये या मुलीवर अत्याचार (Beed Crime) झाला त्या वर्ग खोलीत CCTV नव्हता. त्यामुळे नराधम शिक्षकावर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या संस्थेवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

 

Web Title :- Beed Crime | Shocking Teacher Misbehaving With Girl Student Relative aggression

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा