Beed Crime | धक्कादायक ! 24 तासात दोन 16 वर्षांच्या मुलींची आत्महत्या; प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  बीड जिल्ह्यात (Beed Crime) वेगवेगळ्या ठिकाणी दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींनी (Minor Girl) आत्महत्या (Commit Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी दोन मुलींनी आत्महत्या केल्याने बीड जिल्ह्यात (Beed Crime) खळबळ उडाली आहे. एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील नेकनूर (Neknur) आणि केज तालुक्यात (Taluka Kaij) या दोन घटना घडल्या आहेत.
नेकनूरमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी (Jump into the well) मारुन आत्महत्या केली.

 

रुपाली रमेश मुळे Rupali Ramesh Mule (वय-16 रा. नेकनूर) आणि कोमल गोविंद गायकवाड Komal Govind Gaikwad (वय-16 रा. मस्साजोग) अशी आत्महत्या केलेल्या दोन मुलींची नावे आहेत. कोमल गायकवाड या मुलीने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी (Beed Crime) पाठवले.

 

या दोन्ही मुलांनी आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात (Neknur Police Station)
आणि केज पोलीस ठाण्यात (kaij police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Beed Crime | two 16 year old girls commit suicide in last 24 hours beed district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Symbiosis Law College | सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाकडून येरवडा कारागृहाला पुस्तके भेट

YONO SBI Car Offers | कार खरेदीवर मिळवा 50,000 रुपयांपर्यंत फायदा; YONO SBI ची विशेष ऑफर

Chandrakant Patil | ‘… तर कंगना बरोबर आहे’, कंगनाच्या वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया