Beed Crime | पत्नी अन् तिच्या प्रियकराने धमकावले ! पुण्यातील PMPML बस चालकाची परळीत आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) बसमध्ये चालक (PMPML Bus Driver) म्हणून काम करणाऱ्या तरुणाने त्याच्या बीड जिल्ह्यातील (Beed Crime) मुळगावी जाऊन आत्महत्या केल्याचा (Committing Suicide) प्रकार उघकीस आला आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्याच्या खिशात मिळाली आहे. पत्नी (Wife) आणि तिच्या प्रियकराकडून (Boyfriend) सततच्या धमक्यांना (Threats) वैतागून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानुसार पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात (Ambajogai Rural Police Station) दाखल करण्यात आला आहे.

माधव प्रभाकर ढाकणे Madhav Prabhakar Dhakne (वय-33 रा. अस्वलअंबा, ता. परळी, हल्ली रा. टकले नगर, शेवाळवाडी-Shewalwadi, पुणे) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. माधव ढाकणे हे पुणे महापालिकेच्या बसवर चालक म्हणून काम करत होते. पुण्यात ते पत्नी व मुलासोबत राहत होते. 3 एप्रिल रोजी ते दुचाकीवरुन गावी आले होते. कुटुंबीयांनी एकटा का आला, असे विचारले असता पत्नी शोभा ही जाकीर मुजावर Zakir Mujawar (रा. गोंधळेनगर, हडपसर-Hadapsar) याच्यासोबत पळून गेल्याचे सांगितले. दरम्यान माधव यांनी यासंदर्भात पत्नी बेपत्ता (Wife Missing) झाल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दिली आहे. (Beed Crime)

हडपसर पोलिसांनी तिचा शोध घेतला, मात्र तिने स्वखुशीने जाकीर सोबत आल्याचा खुलासा केला. माधव याने मुलाचा ताबा (Child Custody) मागितला असता शोभा आणि जाकीर याने नकार देत पुणे सोडून निघून जा अन्यथा जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. 5 एप्रील रोजी माधव याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी पँटच्या खिशात सुसाइड नोट (Suicide Note) सापडली.

या सुसाईड नोटमध्ये, पत्नी शोभा व जाकीर मुजावर यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.
मुलाला आपण त्यांच्याकडून घेऊन यावे, अशी विनंतीही त्यांनी चिठ्ठीद्वारे केली आहे.
मयत माधव यांचे भाऊ बालाजी प्रभाकर ढाकणे (Balaji Prabhakar Dhakne) यांच्या तक्रारीवरुन
शोभा ढाकणे व जाकीर मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Beed Crime | wife and her boyfriend threatened pmt bus carrier commits suicide in native village in parli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज,
व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!