Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेयसीला ‘गुपचूप’ भेटणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडून पत्नीने जाब विचारल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर औरंगाबादमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्येही प्रेयसीला हॉटेलमध्ये घेऊन आलेल्या पतीला रंगेहात पकडून पत्नी जाब विचारत होती. अगदी तशीच घटना बीड (Beed Crime) मधील आण्णा भाऊ साठे चौकात सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. प्रेयसीबरोबर ज्यूस बारमध्ये आलेल्या पतीला पत्नीने रंगेहात पकडले. त्यानंतर तोंड लपवून प्रेयसीला घेऊन तेथून निघून जाणाऱ्या पतीची आणि प्रेयसीची भर रस्त्यातच पत्नीने धुलाई (Beed Crime) केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आण्णा भाऊ साठे चौकातील ज्यूसबारमध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत राहणारी एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला घेऊन आली होती. दोघेही काळया रंगाच्या कारमधून आले होते. पतीचे बाहेर कोणाबरोबर तरी लफडे सुरु असल्याची कुणकुण पत्नीला लागली होती. ज्यावेळी पती कारमधून प्रेयसीला घेऊन ज्यूस बारमध्ये आला त्यावेळी पत्नीने आपला भाऊ आणि सासूसोबत पतीच्या कारचा पाठलाग केला. त्यानंतर पतीला आणि त्याच्या प्रेयसीला ज्यूस बारमध्ये रंगेहात पकडले.
Health Survey | भारतीयांची शारीरीक उंची वाढणे झाले बंद? संशोधनात केला हैराण करणारा दावा; जाणून घ्या किती झाली घट
पत्नी, सासू व मेहुण्याला पाहून त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने प्रेयसीसह तेथून काढता पाय घेत कारमध्ये जाऊन बसला.
मात्र, पत्नी थेट कार समोर जाऊन थांबली. कारमधील प्रेयसीला बाहेर खेचण्याचे प्रयत्न केले.
पतीने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
भर रस्त्यात पत्नीने पतीची गचांडी धरली तर प्रेयसीचे डोक्याचे केस धरून जाब विचारला.
रस्त्यावरच सुरु असलेल्या या गोंधळामुळे नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.
पत्नी एकतच नाही म्हंटल्यावर पतीने प्रेयसीला घेऊन कारमधून निघून गेला.
त्यावेळी पत्नीने कारची काच (Beed Crime) फोडली.
दरम्यान, घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या पतीने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले.
मात्र घटना शहराच्या हद्दीत घडली असल्याने पतीला शहर पोलीस ठाण्यात (Beed City Police Station) जाण्यास सांगितले. तर दुसरीकडे पत्नीने शहर पोलीस ठाण्यात (Beed Crime) धाव घेतली.
याबाबतची नोंद अद्यापपर्यंत पोलिसात झाली नव्हती.