Beed Crime | मुलाच्या नोकरीसाठी पतीची केली हत्या; प्रियकराच्या मदतीनं पत्नीचं फिल्मी स्टाइल कृत्य

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  Beed Crime | बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधात (Immoral Relationship) अडसर ठरत असल्याने आणि अनुकंपा तत्त्वावर मुलाला नोकरी लावण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीची (Beed Crime) हत्या केली आहे. आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराच्या सहाय्याने ही हत्या (Murder) करुन आरोपींनी आत्महत्या केल्याचा (Plot as suicide) खोटा कट रचला. घटनेनंतर आरोपी महिलेचा कारनामा उघडकीस आला आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, सारं बिंग फुटलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भीमराव रंगनाथ खराटे (Bhimrao Ranganath Kharate) (वय. 52 रा. कळंब ता. भोगजी) असं खुन केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मृत खराटे हे एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. 29 मे 2021 रोजी केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळुन आला होता.
मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांकडे दिला होता.
तसेच युसूफवाडा पोलीस ठाण्यात (Yusufwada Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, मृत भीमराव खराटे यांचा भाऊ बालाजी खराटे यांना पत्नी, तिचा प्रियकर आणि मुलावर संशय होता. याप्रकरणी बालाजी यांनी युसूफवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.
पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही.
पण बालाजी यांनी हार न मानता कोर्टात (court) धाव घेतली.
त्यानंतर न्यायालयानं संबंधित आरोपींवर युसूफवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पोलिसांनी मृत भीमराव यांची पत्नी राधाबाई भीमराव खराटे (वय, 48), प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे (वय, 40) व मुलगा सिद्धेश्वर भीमराव खराटे (वय, 28) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत.

 

नेमंकं प्रकरण काय?

आरोपी राधाबाई आणि महादेव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते.
पती भीमराव हा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता.
तसेच शिवाय भीमरावची हत्या केल्यास एसटी महामंडळातील सेवा कालावधीचे पैसे मिळतील आणि त्यांच्या जागी मुलगा सिध्देश्वर याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेल.
अशी योजना आखून आरोपींनी भीमराव यांची हत्या केली.
राधाबाई आणि महादेवनं रचलेल्या या बनावात आरोपींनी सिद्धेश्वरलाही सामावून घेतलं होतं.
संबंधित तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

 

Web Title : Beed Crime | wife killed husband with help of boyfriend in immoral relationship beed crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Central Railway News | मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्काराने सत्कार

Pune News | रिलायंस रिटेल लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका ! मोबाइल घेण्यापूर्वीच वॉरंटीचा कालावधी सुरू झाल्याचे ग्राहकाला सांगितले

Sangli Anti Corruption | 1000 रुपयाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात