क्राईम स्टोरीबीड

Beed Crime | लग्नानंतर सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाची आत्महत्या; प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | विवाह थाटामाटात पार पडल्यानंतर आज (सोमवारी) सकाळी सत्यनारायण पूजा घालण्यात आली. सत्यनारायण पुजा संपल्यानंतर नवरदेवाने (Beed Crime) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील नित्रुड येथे घडली. पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) असं त्या नवरदेव तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शनिवार (20 नोव्हेंबर) रोजी माजलगाव येथे त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी सत्यनारायण पूजा पार पडली. सर्व कुटुंबीय आणि नववधू घरातील कामात व्यस्त होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मृत पांडुरंग डाके (Pandurang Dake) हा शेतात गेला आणि त्याने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Beed Crime) केली आहे.

 

दरम्यान, पांडुरंगने आत्महत्या (Suicide) का केली? याचे कारण अजुन अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस (Police) करत आहेत.

 

Web Title :- Beed Crime | young boy commits suicide after Satyanarayana Pooja after marriage; Huge excitement in beed district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button