बीड जि.प. निवडणूकीपूर्वीच भाजपची ‘माघार’, पंकजा मुंडेंनी सांगितलं ‘कारण’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्हा परिषद भाजप जोर लावेल अशी शक्यता होती, मात्र त्याआधी भाजपने मैदान सोडले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मैदान सोडले. शिवसेनेची भाजपला साथ देण्यासाठी असमर्थता असल्याने आणि संख्याबळ नसल्याने भाजपने निवडणूकीतून माघार घेतली. पंकजा मुंडेंनी ट्विट केले की केवळ लोकशाही प्रक्रिया म्हणून आपण निवडणूक लढणार आहे.

जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची नावे समोर येत आहेत, परंतु कायदेशीर पेच असा आहे की 13 तारखेपर्यंत नावे जाहीर करता येणार नाही. त्यानंतर आता जि. प निवडणूकीवर पंकजा मुंडेंनी मौन सोडले आहे.

भाजपने जिल्हा परिषदेतील आपला पराभव मान्य केला आहे. शिवसेना भाजप बरोबर राहीली नाही, त्यामुळे निवडीआधीच भाजपने निवडणूकीतून माघार घेतली आहे. आता ही फक्त लोकशाहीतील एक प्रक्रिया म्हणून भाजप निवडणूकीत सहभागी होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/