बीड जिल्ह्यात आढळले 9 पॉझिटिव्ह रुग्ण, जिल्ह्यात रुग्णांची संख्या 212 वर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आज आणखी 9 पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 212 इतकी झाली आहे. काल एकाच दिवशी २० रुग्ण पॉझिटिव्ह वाढण्याचा पहिलाच दिवस होता.

आज बीड जिल्ह्यातून 717 सॅम्पल तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 286 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 269 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत.

बीड शहरातून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून परळी एक गेवराई एक माजलगाव एक याप्रमाणे आजचा अहवाल प्राप्त झाला आहे.