बीड : जालना रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या इमारतीला वरील बाजूस भीषण आग

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जालना रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या इमारतीस वरील बाजूस आज (रविवार) सायंकाळी भीषण आग लागली. काही वेळापुर्वी लागलेल्या आगीस पुर्णपणे विझवण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाकडून आणि पोलिसांकडून केले जात आहेत.


आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिस दलातील कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालु असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आग कशामुळं लागली आणि आगीत नेमकं किती आणि काय नुकसान झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही.

सविस्तर वृत्त –
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जालना रोडवरील एसबीआयच्या बँकेच्या वरील बाजूस भीषण आग लागली. त्यामध्ये महत्वाचं रेकॉर्ड जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. आगीमध्ये नगरसेवक विशाल घाडगे आणि अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/