गेवराईकडून बीडकडे जाणार भरधाव रिक्षा ‘डिव्हायडर’वर धडकला, चालक जागीच ठार तर इतर 2 गंभीर जखमी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गेवराईकडून बीडकडे अंडी घेऊन येत असलेला रिक्षा औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील ब्रहानपूर फाट्याजवळ आला असता अचानक चालकाचा ताबा सुटला रिक्षा डिव्हायडरला जाऊन धडकला. ही घटना आज (गुरुवारी) संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे.

Death

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, समीर खान जब्बार खान ( वय 37, रा. बुंदेलपुरा, बीड) हे गेवराई येथील एका पोल्ट्री फार्म वरून कोंबडीची अंडी घेऊन येत असताना गेवराई पासून अवघ्या पंधरा किलोमीटर असलेल्या ब्रहानपूर फाट्यावर रिक्षा हा डिव्हाडरला धडकली. या धडकेत समीर जब्बर खान (चालक) याचा जागीच मृत्यू झाला तर सय्यद मुस्ताक (वय 43, रा. गेवराई) आणि इतर एक जण जखमी असल्याची माहिती महामार्ग पोलीस यांनी दिली आहे.

या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बांगर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून त्यांनी मृतदेह व जखमीला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/